गुजरातमध्ये ‘त्यांना’ बराच त्रास होतोय! मुख्यमंत्री केजरीवालांचा भाजपला टोला | पुढारी

गुजरातमध्ये ‘त्यांना’ बराच त्रास होतोय! मुख्यमंत्री केजरीवालांचा भाजपला टोला

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकी पूर्वीच आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे. दिल्लीतील सत्ताधारी आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीकास्त्र डागले. ”अगोदर सत्येंद्र जैन यांना अटक केली. पंरतु, कुठले पुरावे मिळाले नाही. मनीष सिसोसियांकडे टाकलेल्या धाडीत काही मिळाले नाही. आता अमानतुल्ला यांना अटक केली आहे.अजून आणखी काही आमदारांना अटक केली जाईल. गुजरात मध्ये ‘त्यांना’बराच त्रास होत आहे”, असा टोला केजरीवाल यांनी ट्विटरवरून भाजपला लगावला.

आप आमदार अमानतुल्ला यांना दिल्ली पोलिसांच्या एसीबी पथकाने शुक्रवारी अटक केली होती.आता या अटकेवरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आपचे प्रवक्त सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून भाजपवर निशाणा साधला. गेल्या काही महिन्यांपासून भाजप एका विशेष पद्धतीने सरकारी विभागांचा वापर करीत खोटे चित्र उभं करीत आहे.अगोदर सत्येंद्र जैन यांच्या घरी धाड टाकण्यात आली. त्यानंतर मनिष सिसोदियांच्या घरी धाड टाकण्यात आली.

जैन यांच्या निकटवर्तीयांकडे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान येथून जवळपास ३ कोटींची रक्कम मिळाल्याचे एजेंन्सीकडून सांगण्यात आली. पंरतु, जैन यांच्या कुठल्या निकटवर्तींयाकडून ही रक्कम मिळाली हे सांगण्यास एजेन्सी तयार नसल्याचे भारद्वाज म्हणाले. शुक्रवारी अमानतुल्ला यांच्या घरी धाड टाकली. पंरतु, पथकाला काही एक मिळाले नाही.आप ला घाबरल्याने भाजपकडून हे केले जात आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा वाढता जनाधार भाजपला एजेन्सीचा दुरूपयोग करण्यास बाध्य करीत असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला.

हेही वाचा : 

 

Back to top button