हिंगोली : विद्यार्थिनींवर अत्‍याचार करणाऱ्या ‘त्‍या’ मुख्याध्यापकावर आणखी दोन गुन्हे दाखल

भगवान पंडितराव अवचार
भगवान पंडितराव अवचार
Published on
Updated on

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थिनींवर अत्‍याचारप्रकरणी अटक असलेल्‍या मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार (रा. भोशी तालुका, कळमनुरी) याच्‍यावर आणखी  दाेन गुन्‍हे दाखल झाले आहेत.  सध्या ताे पोक्सो कायद्यांअंतर्गत न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. बोधनापोड आणि पो. नि. शिवाजी बोंडले यांच्या समक्ष फिर्यादी हजर झाले.  पीडित मुली व त्यांचे पालक हजर राहून १७ ऑगस्ट रोजी उशिरा जबाब नोंदवण्यात आला.

मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार (रा. भोशी तालुका, कळमनुरी) याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना स्टोअर रूममध्ये बोलावून त्‍यांच्‍यावर अत्‍याचार केला.  ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी नऊ ते बारा यावेळी स्टोर रूममध्ये शिकवणीच्या नावाखाली हा प्रकार घडला. का मुलीच्या फिर्यादीवरून सदर मुख्याध्यापकावर भा.दं.वि. कलमच्या विविध गुन्ह्यासह कलम १०, १२, पोक्सो २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

मुलींना व त्यांच्या आई-वडिलांना  महिला बालकल्याण समिती येथे नेऊन त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्‍यात आले. यानंतर त्यांची तक्रार देण्याची मानसिकता झाली. अत्याचार करणारा  आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असल्याने मुलींना व पालकांना त्याच्यापासून भीती राहिली नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पीसी बोधनापोड आणि पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी  दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news