सांगली : एसटी बस चालवणे गुन्हा असेल तर माझ्यावर कारवाई करा : जयंत पाटील (Video) | पुढारी

सांगली : एसटी बस चालवणे गुन्हा असेल तर माझ्यावर कारवाई करा : जयंत पाटील (Video)

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर उत्साहात साजरा होत असताना त्या दिवशी एसटी बस चालवून मी जर गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी. असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विरोधकांना दिले .

सोमवार (दि.१५ ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी येथील तहसील कार्यालय परिसरात इस्लामपूर आगाराची एसटी बस चालविली होती. या कृतीवर आक्षेप घेत तालुका भाजपने आ. जयंत पाटील यांनी एसटी बस चालवून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावर मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत असताना यात एसटी महामंडळाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनी विनंती केल्यामुळे मी बस चालविली. शि‍वाय माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही आहे. एसटी बस चालवून मी जर काय गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी, असे म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button