(Video) : चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे चारही दरवाजे बंद; मासे पकडण्यासाठी खवय्यांची गर्दी  | पुढारी

 (Video) : चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे चारही दरवाजे बंद; मासे पकडण्यासाठी खवय्यांची गर्दी 

शित्तूर-वारूण(जि.कोल्हापूर);  पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे चारही दरवाजे काल बुधवार (दि. १७) रोजी बंद करण्यात आले आहेत. दहा दिवसांपूर्वी धरण प्रशासनाने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला १ हजार ५४६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग बंद केला. सध्या धरणाच्या विजगृहातून १५९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरु आहे.  विसर्ग पूर्ण बंद झाल्याने सांडवा क्षेत्रात मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

 गेल्या २४ तासात चांदोली धरण क्षेत्रात केवळ २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आजअखेर २ हजार २२१ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन यंञावर झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६२३.९० मीटरवर पोहचली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण सध्या ९०.१४ टक्के भरले असून धरणात सध्या ८७८.१५८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने धरणात ३ हजार ४७५ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून धरणाच्या विजगृहातून १५९५ क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button