बीड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सात वर्षे कारावासाची शिक्षा | पुढारी

बीड: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सात वर्षे कारावासाची शिक्षा

केज पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील एका गावात ३६ वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीला फसवत, तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला ७ वर्ष कारावास व ३० हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबतची माहिती अशी की, सप्टेंबर २०१६ मध्ये सारणी (सांगवी) ता. केज येथील वसंत घोळवे (वय-३६ वर्ष) याने गावातील एका अल्पवयीन मुलीला केळी आणायला चल असे आमिष दाखवले. तिला मोटार सायकलवर बसवून केज-कळंब रोड जवळच्या शेतात नेऊन बलात्कार केला. या मुलीने तिच्यावरील अत्याचाराची माहिती घरी सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. २९ सप्टेंबर २०१६ रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३०२/२०१६ भा. दं. वि. ३६६ (अ), ३७६ (२) (एफ) यासह बाल लैंगिक अन्याय अत्याचार निर्मूलन कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ४, ८, १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तात्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिडके आणि मंगेश भोले व अशोक नामदास यांच्या मदतीने तपास पूर्ण केला. तपास पूर्ण होताच त्यांनी मा. जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. शिवाजी मुंडे यांनी काम पाहिले. याप्रकरणी न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस. जे. घरत यांनी दोन्ही पक्षाचा केलेला युक्तिवाद आणि साक्षपुरावा यांच्याआधारे आरोपी वसंत घोळवे याला ७ वर्षे कारावास आणि ३० हजार रु. च्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button