

औंढा नागनाथ : राष्ट्रीय महामार्गवरील (क्र. ७५२-१) खड्डे बुजविण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गांभीर्याने घेत नाही. याच्या निषेधार्थ आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज धारफाटा येथे सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
औंढा टी पॉईंट ते जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्य़ा अनेक महिन्यांपासून असंख्य खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे झालेल्या अपघातांचा येथील पोलीस ठाण्यातील आकडा थक्क करणारा आहे. अखेर पोलीस प्रशासनानेही तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी संबंधित विभागाकडे केली होती. ७ जुलै रोजी राष्ट्रवादीचे संजय दराडे यांनी आठवड्याभरात रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु पंधरा दिवस उलटूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने आज (दि २१) आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात औंढा जिंतूर रोडवरील धारफाटा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता जी.बी.हाके यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय दराडे, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण टोम्पे, रमेश सानप, रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे, नारायण लोनसने, गोपाळराव मगर, भगवान ईघारे, प्रेमदास चव्हाण, सुरेश नाडार, गजानन सांगळे, सुभाष कावरे, साहेबराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन ठिकाणी तहसील विभागाचे नायब तहसीलदार लता लाखाडे, संदीप डोंगरे यांनी भेट दिली. पोलीस प्रशासनाने आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तात पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे, पो उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, सुवर्णा वाळके, दत्ता ठोंबरे, संदीप टाक, रवी इंगोले, यशवंत पवार, ज्ञानेश्वर गोरे आदी. पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :