राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी हा रुबाबदार चेहरा बनला आहे सोशल मीडिया सेन्सेशन | पुढारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी हा रुबाबदार चेहरा बनला आहे सोशल मीडिया सेन्सेशन

सोशल मीडिया माहिती नाही किंवा त्याचा कोणताच गंध नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. आज जवळपास प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाशी या ना त्या कारणाने जोडलेली आहे. पण सोशल मीडिया केवळ अभिव्यक्तीच माध्यम नाही. तर सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म बनला आहे जिथे तुम्ही कोणत्याही कानाकोपर्‍यातून जगासमोर सादर होऊ शकता.

अर्थातच सामाजिकरित्या व्यक्त होत असताना या माध्यमाचे काही नियमही पाळावे लागतात. भाषा आणि विचार इतरांना वैचारिक हानी पोहोचवणारे नसावेत हे सोशल मीडिया वापराचे संकेत आहेत. जगाच्या पाठीवरील कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी एका क्षणात जोडून देणा-या सोशल मीडियाचा उपयोग करून अत्यंत विधायक कामं करता येणं शक्य आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चेहरे रातोरात स्टार बनले आहेत. एका सेलिब्रिटीलाही मोहात पाडेल अस फेम या सोशल मीडिया स्टारच्या वाट्याला येताना दिसतं. एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवणारी ही किमया देखील साध्य होते आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून.

एका रात्रीत सोशल मीडिया सेंसेशन बनेल्या सेलिब्रिटींच्या यादीत आता आणखी एका रुबाबदार चेहर्‍याची भर पडली आहे. हा रुबाबदार चेहरा दूसरा तिसरा कोणी नसून खुद्द राष्ट्रपतींचा सुरक्षा रक्षक आहे.

मेजर गौरव चौधरी अस या व्हायरल होत असलेल्या रुबाबदार कमांडोचं नाव आहे. विशेष म्हणजे गौरव यांचं सोशल मीडियावर एकही अकाऊंट नाही तरी त्यांच्या नावाचे तब्बल 16 फॅनपेज सोशल मीडियावर सुरू आहेत. 10th बटालियन पॅरॅशूट रेजिमेंटमधेही त्यांनी सेवा बजावली आहे.

याशिवाय पॅरा स्पेशल फोर्स युनिटमध्ये पॅराकमांडिंग प्रशिक्षणानंतर बलिदान सील मिळवून सेवा बजावली. तर जम्मू-काश्मीरसह पॅरा स्पेशल फोर्सचा भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत भाग घेतला होता. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर एका रात्रीत गौरव यांचं फॅन फॉलोविंग जोरात वाढलं. एका सेलिब्रिटीप्रमाणेच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांचे फॅनक्लब व्हायरल करत असतात.

 

Back to top button