हिंगोली : जयपूर येथील मारहाणप्रकरणी परस्पराविरोधी गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : जयपूर येथील मारहाणप्रकरणी परस्पराविरोधी गुन्हा दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील दोन कुटुंबीयांनी परस्पर भांडण्यातून एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, संतोष पुंजाजी पायघन, सुभाष पुंजाजी पायघन, पुंजाजी पायघन, भिकाजी पायघन (सर्व रा. जयपूर) यांनी सोमवारी ( दि. २० जुन) रोजी तुमच्या मुलाने आमची मुलगी पळवून नेली, असे सांगत संतोष पायघनने त्याच्याजवळ असलेला चाकूने फिर्यादीवर वार करून त्याला जखमी केले. प्लास्टिकच्या दांड्याने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. यानंतर माधव शिवराम गिरी (वय ७०, रा. जयपूर ) याच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली.

सोमवारी (दि. २० जुन) रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जगदीश माधव गिरी, माधव गिरी व उमा गिरी (रा. जयपूर) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलाच्या मेडिकलच्या दुकानात गेले होते. यानंतर जगदीश आणि माधव गिरी यांनी रक्‍तदाबावरील औषध मागितले.यावेळी मुलाने गोळ्या नाहीत म्हणून सांगितले. यानंतर दोघांनी औषध मेडिकलचे दुकान कशाला घातलेस म्हणून वाद घातला. यानंतर फिर्यादीच्या मुलास मेडिकलच्या बाहेर काढून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

यावेळी जगदीश गिरीने हातात दगड घेऊन मारहाण केल्याने तो जखमी झाला. याच दरम्यान फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलाही शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर फिर्याद सरस्वती पुंजाजी पायघन (वय ६०, व्यवसाय घरकाम, रा. जयपूर) यांनी याबाबतची सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button