परिणितीची स्वच्छता मोहीम | पुढारी

परिणितीची स्वच्छता मोहीम

परिणिती चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ही अभिनेत्री समुद्रातून प्लास्टिक कचरा बाहेर काढत असताना दिसून येते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, डायव्हिंग करीत असताना मला खूप मजा आली. मात्र, प्लास्टिक कचरा बाहेर काढण्यासाठीही विशेष डायव्हिंग केले. समुद्र स्वच्छ करण्यासाठी आमच्याशी निगडीत राहा!

परिणिती स्वतः एक सर्टिफाईड स्कुबा डाईव्ह इन्स्ट्रक्टर आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिचे कौतुक केले. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रियाही चाहत्यांकडून आली. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर ती आता अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासमवेत ‘उंचाई’ या चित्रपटात झळकणार आहे.

Back to top button