हिंगोली : पोलीस अधिकार्‍यास शिवीगाळ व धमकी देणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : पोलीस अधिकार्‍यास शिवीगाळ व धमकी देणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

कुरूंदा : पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील वाई फाटा येथे पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ करुन धमकी देणार्‍या पाच जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात आज (दि. १९ ) गुन्हा दाखल झाला. सुरेश प्रल्हाद कदम, प्रल्हाद मारोती कदम, विनय विलास मोगले, दत्ता संभाजी कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वसमत तालुक्यातील वाईफाटा येथे सुरेश प्रल्हाद कदम, प्रल्हाद मारोती कदम, विनय विलास मोगले, दत्ता संभाजी कदम व अन्य एक जण आपापसात हाणामारी करत होते. यावेळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी तेथे पोहोचले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चौघांनी गवळी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. तसेच गवळी यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. त्यानंतर पाचही जण तेथून निघून गेले.

याप्रकरणी गवळी यांनी रविवारी पहाटे कुरुंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सुरेश कदम, प्रल्हाद कदम, विनय भोगले, दत्ता कदम व अन्य एका विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button