

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त आईची भेट घेवून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले. या वाढदिवसाच्या औचित्याने पीएम मोदींनी एका खास ब्लॉग शेअर करून आईच्या स्वभावाबद्दल सांगितले. या ब्लाॉगमध्ये त्यांनी त्यांचा लहानपणीचा मित्र अब्बास याचाही उल्लेख केला आहे. परंतु, मोदींचे लहानपणीचा मित्र अब्बास कोण आहेत? आणि ते सध्या काय करतात? हे तुम्हाला माहित आहे का? तर चला जाणून घेवूयात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन यांनी शनिवारी १०० व्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांचे पायांची पूजा करून त्याचा शुभ आशीर्वाद घेतले. याच दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर आई हीराबेन याच्या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या स्वाभावाबद्दल एक ब्लाॅगही शेअर केला. यात मोदींनी आपल्या लहानपणीचा मित्र अब्बास यांची आईने कशी काळजी घेतली यांचा उलगडा केला आहे.
अब्बास हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या वडिलांचा मित्राचा मुलगा होता. अब्बास त्यांच्या वडिलांसोबत जवळच्या गावात राहत होता. परंतु, काही काळानंतर त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि तो एकटा पडला. ही घटना मोदींच्या वडील आणि आई हिराबेन यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला घरी आणले. अब्बास शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोदी यांच्या कुटुंबासोबत राहिला. या काळात हिराबेन यांनी अब्बासचा जेवण्यापासून ते शाळेतील अभ्यासापर्यन्त सर्व काळजी घेतली. अगदी स्वत: च्या मुलाप्रमाणे त्यांनी अब्बासचा सांभाळ केल्याचे माेदी यांनी सांगितले आहे.
याशिवाय ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खायला घालायची. तर सणासुदीच्या काळातही आजूबाजूची काही मुलं आमच्या घरी येऊन जेवायची. आईच्या हाताने बनवलेला पदार्थही त्याला खूप आवडत असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले आहे. मोदींचा बालपणीचा मित्र अब्बास सध्या कोठे आहे?. काय करतो? याबाबत सोशल मीडियात तर्क- वितर्क लावले जात आहेत. तर सध्या अब्बास ऑस्ट्रेलिय वास्तवास असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपणीचे मित्र अब्बास सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहतात. अब्बास यांना दोन मुले आहेत. धाकटा मुलगा ऑस्ट्रेलिया तर त्यांचा मोठा मुलगा गुजरातच्या कासीम्पा गावात राहतो. अब्बास यांनी ऑस्ट्रेलियातील अन्न व पुरवठा विभागात अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
हेही वाचलंत का?