पिंपरी : खादीवर ‘संक्रांत’, निवडणुका येऊन ठेपल्याने खादीची विक्री वाढेल, असा अंदाज | पुढारी

पिंपरी : खादीवर ‘संक्रांत’, निवडणुका येऊन ठेपल्याने खादीची विक्री वाढेल, असा अंदाज

शशांक तांबे
पिंपरी : खादीला स्वातंत्र्य लढाईचा इतिहास असून खादी म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर राजकीय व्यक्ती येते. खादी म्हणजे रुबाबदारपणाचे लक्षण असताना खादीची विक्री कमी होत असल्याने खादीचा रुबाबही कमी होत आहे. शहरात खादीच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्याची जागा इतर उत्पादनाने घेतली आहे.

पूर्वी गावात , राजकारणात खादीला महत्व होते; परंतु गेल्या काही वर्षात खादीच्या विक्रीचा आलेख उतरता होत आहे. शहरात 5 – 6 खादी कापड विक्रेते होते. त्यांची संख्या आता 1-2 वर आली आहे. कोरोनामुळे खादीची विक्री थंडावली होती. तब्बल 2 वर्ष खादीची विक्री खूप कमी प्रमाणात होती. सध्या महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्याने खादीची विक्री वाढेल, असा अंदाज व्यावसायिक व्यक्त
करत आहेत.

खादीचा उपयोग
खादीचा वापर राजकीय व्यक्ती मोठ्या प्रमाणात करत असल्या तरी खादी वापरण्यामागे शास्त्रीय कारण आहे. खादी कपडा कोणत्याही वातावरणात समरूप होणारा असतो. त्यामुळे थंडीमध्ये खादी जॅकेटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर उन्हाळ्यात उकाड्यापासून बचाव व्हावा म्हणून पांढर्‍या खादीचा वापर केला जातो. यामुळे उन्हाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते. तसेच खादीमुळे त्वचा कोरडी पडत नाही.
खादीचे कपडे
जॅकेट शर्ट पॅन्ट झब्बा, कुर्ता
महिलांसाठी – चुडीदार व कुर्ता, ड्रेस

खादीची विक्री
वर्ष पुणे शहर पिंपरी शहर
2017 20 टक्के 12 टक्के
2018 10 टक्के 4 टक्के
2019 20 टक्के 15 टक्के

Back to top button