Prime Minister: पंतप्रधान मोदी उद्यापासून कर्नाटक दौऱ्यावर | पुढारी

Prime Minister: पंतप्रधान मोदी उद्यापासून कर्नाटक दौऱ्यावर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार (दि.२०), मंगळवारी (दि.२१) कर्नाटकच्या दौऱ्यावर (Prime Minister’s visit) जाणार आहेत. सोमवारी त्यांच्या हस्ते राजधानी बंगळुरू तसेच म्हैसूरमधील २७ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये सेंटर फॉर ब्रेन रिसर्चची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्राबरोबरच बागची-पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन (Prime Minister’s visit) पंतप्रधान मोदी करणार आहेत. याठिकाणी असलेल्या आंबेडकरांच्या नवीन पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

कर्नाटक आयटीआयच्या माध्यमातून १५० टेक्नॉलॉजी हबची सुरुवात करण्यात आलेली आहे. याचे देशार्पण पंतप्रधान करतील. तर कोम्माघाटा येथे 27 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
म्हैसूरच्या महाराजा मैदानावर मोदी यांची सार्वजनिक सभा होणार आहे.

याठिकाणी नागनहल्ली रेल्वे स्थानकाचे उद्घाटन एआयआयएसएच संस्थेच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे ते देशार्पण करतील. या कार्यक्रमानंतर ते म्हैसूरमधील श्री सत्तूर मठ तसेच श्री चामुंडेश्वरी मंदिराला (Prime Minister’s visit) भेट देतील. 21 तारखेला मोदी म्हैसूर पॅलेस मैदानावर जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button