काेल्‍हापूर : चंदगड पोलीस ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे 'लाचलुचपत'च्‍या जाळ्यात | पुढारी

काेल्‍हापूर : चंदगड पोलीस ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे 'लाचलुचपत'च्‍या जाळ्यात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दाखल गुन्ह्यात तक्रारदार तसेच त्यांच्या वडिलांना तपासकामात मदत करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय 34, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यांना लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार व्यक्ती आणि त्यांच्या वडिलांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे हे करीत होते. पांडे यांनी तपासात मदत करण्यासाठी प्रथम 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावर चाळीस हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यापैकी वीस हजार रुपये स्वीकारताना एसीबीचे पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

Back to top button