पोलिसांनी महिलेच्या घराकडे जाणारे सर्व सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती दुचाकीवरून आल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या संपर्कातील लोकांची तपासणी सुरू केली. दरम्यान राजुच्या गाडीवर पोलीसांना संशय आला. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या गाडीची नंबरप्लेट तुटलेली होती, समोरील भाग तुटलेला होता, गाडीला स्वीच नव्हता. परंतु राजुच्या गाडीला नवीन नंबर प्लेट होती,समोरील भाग नवीन होता, स्विच नवीन होता. त्यामुळे पोलिसांची खात्री झाली आणि त्यांनी राजूची चौकशी केली असता खून केल्याची कबुली त्याने दिली.