अल्पवयीन मुलाने सरपंच पुत्राच्या मदतीने केला बापाचा गेम

अल्पवयीन मुलाने सरपंच पुत्राच्या मदतीने केला बापाचा गेम
Published on
Updated on

यवत/पाटस : पुढारी वृतसेवा

आई ला त्रास देतो म्हणून अल्पवयीन मुलाने सरपंच पुत्राच्या मदतीने बापाचा गेम केल्याची खळबळ उडवून देणारी घटना वरवंड (ता.दौंड) मध्ये घडली आहे. याबाबत यवत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरवंड येथील राजेंद्र म्हस्के हे गेल्या 9 दिवसांपासून गायब असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी ने यवत पोलिसांत दिली होती. त्याचा तपास करत असताना रविवारी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१७ वर्षांच्या मुलाने आपल्याच बापाच्या डोक्यात हातोडी घालून खून केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. आईला सतत दारू पिऊन बाप मारत असल्याने याची चीड मनात येऊन जन्मदात्या बापाचा काटा काढून ठार मारल्याची घटना घडली. यातील खून झालेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र म्हस्के असून या प्रकरणातील त्याचा अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र सरपंच पुत्र स्वस्तिक संजय खडके (वय-२१ रा. वरवंड ता.दौंड) यांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news