तस्कराकडून आठ लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त | पुढारी

तस्कराकडून आठ लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एका सराईत अमली पदार्थ तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने येरवड्यात सापळा रचून पकडले. त्याच्याकडून मेफेड्रॉन (एमडी), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाईल असा सात लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. समीर उर्फ आयबा शहाजहान शेख (रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शेख अमली पदार्थांच्या तस्करीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही अमली पदार्थांचे चार गुन्हे दाखल आहेत. येरवडा व इतर परिसरातील हाय प्रोफाईल पार्ट्यात तो अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्याकडे अनेक ग्राहक अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असल्याची माहिती आहे.

पावसाळापूर्व कामे अद्याप सुरूच; नव्वद टक्के कामे झाल्याचा पालिकेचा दावा

अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथक येरवड्यातील पर्णकुटी भागात गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी विशाल शिंदे यांना पर्णकुटी टेकडीच्या पायथ्याजवळ शेख थांबला असून, त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मारुती पारधी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी यांनी सापळा रचून शेखला पकडले. त्याच्याकडून सात लाख 81 हजारांचे 52 ग्रॅम मेफेड्रॉन, पिशवी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा 

शनिशिंगणापूर सेवा संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध

Presidential Election : राज्यसभेनंतर वाजणार राष्ट्रपती निवडणुकीचे बिगुल

पाथर्डीतील अतिक्रमणांवर पडणार हातोडा, पालिकेची तयारी पूर्ण

Back to top button