हिंगोली: शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शिबिराचे आयोजन | पुढारी

हिंगोली: शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शिबिराचे आयोजन

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: जवळा बाजार (ता. औंढा, जि.हिंगोली) येथे किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने किसानपुत्रांची जनजागृती करण्यासाठी एक दिवसीय विचार शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबिरात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्‍यात आली.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सर्व किसानपुत्राच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

कार्यक्रमाला परिसरातील राजकीय नेत्‍यांसह शेतकऱ्यांची उपस्थितीत होती. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येवून एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन आकाश अंभोरे यांनी केले. ॲड. रहिम खुरेशी यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.

शेतकरी विरोधी कायद्यांची माहिती

कार्यक्रमाची सुरूवात सर्व आमंत्रित मंडळीच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. सर्व आमंत्रित वक्त्यांनी किसानपुत्रांना शेतकरी विरोधी कायद्यांची माहिती दिली.

या वेळी कार्यक्रमाचे निमंत्रक रामकिसन अप्पा रुद्राक्ष, प्रमुख पाहुणे अमर हबीब, संगीताताई देशमुख, सुभाष कच्छवे, बाजीराव अबादार, मुनीरजी पटेल, धोंडीरामजी अंभोरे, मुरलीधर मूळे, आदित्य आहेर, फारूख सॅमिल, अनिलशेठ बडजाते यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसरातील शेतकरी आणि युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभि विभुते, दत्ता बुलाखे, भागवत जाधव, कान्हा वाढवणकर, शिवम चन्ने, सोपान गाढवे, वैभव उबाळे, संतोष वाजे, विनायक जाधव, संतोष तागडे,नारायण जाधव, योगेश राखोंडे, विजय काळे आदी उपस्‍थित होते.

हेही वाचलंत का? 

पाहा : ज्ञानकौशल्य आणि वागणूक हीच यशाची गुरुकिल्ली

Back to top button