परभणी : महाविद्यालय बाबत प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे एस.ओ.पी.करणार; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती | पुढारी

परभणी : महाविद्यालय बाबत प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे एस.ओ.पी.करणार; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

परभणी, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाबाधितांच्या संख्येचे प्रमाण राज्याच्या प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे असल्यामुळे त्या – त्या जिल्ह्यांतील महाविद्याल  सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक अहवालानंतर महाविद्यालय सुरू केली जातील, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची एस.ओ.पी. वेगवेगळी असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी (दि.12) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांच्या दौर्‍यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआर मधून तिसरी लाट रोखण्यासाठी दिलेल्या व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या दोन्ही लाटेत शासन व प्रशासनाने चांगले काम केले आहे. असेही उदय सामंत यांनी म्हटले.

मात्र व्हेंटीलेटरअभावी रूग्णांची हेळसांड होवू नये, यासाठी व्हेंटीलेटर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर आगामी तीन ते चार दिवसांत भर देण्याबरोबरच प्राध्यापक कर्मचार्‍यांचेही लसीचे दोन डोस झाले आहेत वा नाही याची तपासणी केली जाणार आहे. 50 टक्के उपस्थितीमध्ये महाविद्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक अहवालानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करीत संस्थाचालकांचीही बैठक घेवून प्रशासनाने याबाबतचा निर्णय कळवावा.

वसतीगृहांच्या बाबतीतही असा सकारात्मक अहवाल आल्यास वसतीगृहे व महाविद्यालय सुरू करता येतील, असेही उदय सामंत म्हणाले.

पत्रकार परिषदेस आमदार डॉ.राहूल पाटील,आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे उपस्थित होते.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?

 

Back to top button