परभणी : जिल्हाधिकारी पदभाराविषयी शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार | पुढारी

परभणी : जिल्हाधिकारी पदभाराविषयी शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

परभणी; पुढारी वृत्तसेवा : आयएएस अधिकारी आंचल गोयल यांच्या परभणी जिल्हाधिकारी पदाच्या पदभाराचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोचविण्यात आला आहे. खासदार फौजिया खान यांनी सोमवारी नवी दिल्लीत पवारांची भेट घेवून त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर शरद पवार यांनी हा चुकीच्या पद्धतीने हा विषय हाताळला गेल्याचे नमुद केले. तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार खान यांनी ही माहिती दिली.

अधिक वाचा :

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदाच्या पदभाराचा विषय गाजू लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनानेच आंचल गोयल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली होती.

परंतु विद्यमान जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे गोयल यांनी पदभार स्विकारला नव्हता. शनिवारी त्यांनी पदभार स्विकारण्यापुर्वीच स्थानिक पातळीवर झालेल्या घडामोडींतून व दबावतंत्रातून त्यांना पदभारापासून दूर ठेवण्यात आले.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अंशतः बदलाचे आदेश ऐनवेळी काढून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना पदभार देण्याचे निर्देश दिले.

अधिक वाचा :

परिणामी गोयल या त्याचदिवशी मुंबईकडे रवाना झाल्या. या सर्व प्रकाराबाबत खासदार फौजिया खान यांनी सोमवारी दिल्ली येथे संसद भवनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेवून हा प्रकार सांगितला.

एका महिला आयएएस अधिकार्‍यास ऐनवेळी पदभार न देण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे नमुद केले. त्यावर पवार यांनाही हा विषय चिंताजनक वाटला.

त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. खा. खान यांनी या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही, असेही सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button