जालना : साेनलनगरमध्‍ये मायलेकीचा संशयास्‍पद मृत्‍यू, परिसरात खळबळ | पुढारी

जालना : साेनलनगरमध्‍ये मायलेकीचा संशयास्‍पद मृत्‍यू, परिसरात खळबळ

जालना ; पुढारी वृत्‍तसेवा जालना शहरातील सोनलनगरात मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली.  जालना शहरातील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या सोनलनगर भागात भारती गणेश सातारे (वय 36) आणि त्यांची मुलगी वर्षा गणेश सातारे (वय 17) या दोघी मायलेकींचे मृतदेह सकाळी त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. दरम्यान, या मायलेकीचा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह  जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.  भारती सातारे यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमांच्या खुणा  आढळल्‍या. ही घटना पहाटेपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे.

मायलेकींचा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेने सोनलनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या दोघी मायलेकीचा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. मृत महिलेचे पती गणेश सातारे यांना दोन पत्नी असून, दोघी एकाच घरात राहत होत्या अशी माहिती पोलिसांनी दिले.

हेही वाचा : 

 

Back to top button