

पुढारी ऑनलाईन डेस्क : Actress Suicide : बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे हिचा कोलकाता येथे राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह येथे सापडला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासाअंती ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. पल्लवी 'मन माने ना' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पल्लवीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून येताच तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच पल्लवीने या जगाचा निरोप घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पल्लवीच्या अचानक आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. टीव्ही शो 'मोन माने ना'मध्ये ती लीड रोलमध्ये होती. पल्लवीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर 'रेशम झांपी' या टीव्ही सीरियलमध्ये काम केल्यानंतर तिला विशेष ओळख मिळाली.
पल्लवी तिच्या चाहत्यांची लाडकी होती. तिचा अभिनय आणि तिने साकारलेल्या भूमिकांना चांगलीच पसंती मिळाली. पल्लवीच्या मृत्यूने तिच्या को-स्टार्ससह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पल्लवीच्या आत्महत्येचे वृत्त मिळताच तिची को-स्टार अनमित्रा बताब्याल हैराण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने पल्लवीसोबत चित्रीकरण पूर्ण केले होते. ती म्हणाली, 'मी सुन्न झाली आहे. आम्ही 12 मे रोजी टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग केले आणि नंतर आम्हा सोघांमध्ये संवाद साधला. आम्ही चांगल्या गप्पा मारल्या. पण तिच्या आत्महत्येची बातमी कळताच मी हैराण झाले. मल काहीच समजेना पल्लवीने हे पाऊल का उचलले.'