नगर : शरद-रेणुकादेवी साखर कारखान्यातील कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - पुढारी

नगर : शरद-रेणुकादेवी साखर कारखान्यातील कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पैठण : पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील चौडाळा शरद- रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्यातील कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. काळू बाळासाहेब मोरे ( वय २५, रा. शिवाजीनगर, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री काळू मोरे हा साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे ऊस वजन विभागामध्ये काम करीत होता. यावेळी त्याला विजेचा धक्का लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला इतर कामगारांनी तत्काळ पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साबळे यांनी काळू याची तपासणी केली असता तो मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, जमादार सुधाकर मोहिते यांना मिळतात घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अप्पासाहेब माळी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button