AFC Asian Cup 2023 | चीनने २०२३ आशियाई चषकाचे यजमानपद सोडले! - पुढारी

AFC Asian Cup 2023 | चीनने २०२३ आशियाई चषकाचे यजमानपद सोडले!

पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या वाढत्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने आशियाई चषक (AFC Asian Cup 2023) फायनलच्या यजमानपदाचे हक्क सोडले आहेत. याबाबतची घोषणा आशियाई फुटबॉल महासंघाने (AFC) केली आहे. चायनीज फुटबॉल असोसिएशन (CFA) सोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान चीनने सध्याच्या कोरोना परिस्थितीत AFC आशियाई चषक २०२३ चे आयोजन करण्यास सक्षम नसल्याचे सांगितले आहे.

५ जून २०१९ रोजी AFC आशियाई चषक २०२३ चे यजमान म्हणून चीन PR ची नियुक्ती करण्यात आली होती. १६ जून ते १६ जुलै २०२३ या कालावधीत २४ संघांमध्ये ही स्पर्धा १० चीनमधील शहरांमध्ये आयोजित केली जाणार होती. COVID-19 मुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चीनने स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क सोडले असल्याचे Asian Football Confederation ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

AFC त्याच्या व्यावसायिक भागीदार आणि भागधारकांसोबत काम करत राहील आणि या कालावधीत त्यांनी समजून घेतल्याबद्दल आणि समर्थनासाठी त्यांचे आभारी असल्याचे AFC ने म्हटले आहे. AFC आशियाई चषक २०२३ च्या (AFC Asian Cup 2023) यजमानपदाशी संबंधित पुढील अधिक तपशील योग्य वेळी घोषित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून १० ते २५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेली आशियाई क्रीडा स्पर्धादेखील (Asian Games 2022) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पुढील काही दिवसांत स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असे आशियाई खेळ आयोजन समितीकडून याआधी सांगण्यात आले आहे.

 

Back to top button