आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन भुजबळांच्या कानपिचक्या, म्हणाले.. - पुढारी

आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरुन भुजबळांच्या कानपिचक्या, म्हणाले..

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौ-यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ना. आदित्य ठाकरे काल नाशिक दौ-यावर होते. या दौ-याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, आदिवासी पाड्यांवर अगोदरपासूनच काम सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनी आधी चौकशी करायला हवी. इकडे काम अगोदरच सुरु झालेले असते तरीही ते काम शिवसेनेेने केले आहे, असे दाखवायचे हे काही बरोबर नाही. मला वाटते की, जिल्हा प्रशासन आणि अन्य खात्यावर हा एकप्रकारे अन्याय करण्यासारखे आहे.  जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद अथवा ग्रामविकास विभाग यापैकी कुणीही काहीच करत नाही असाच याचा अर्थ होतो अशा शब्दात भुजबळांनी आदित्य ठाकरे यांना कानपिचक्या लगावल्या.

भुजबळ एवढ्यावरच थांबले नाही तर, कामाचे श्रेय कुणीही घ्या, पण मंत्र्यांना मिसलीड करु नका. स्थानिक नेत्यांनीही आपल्या नेत्यांची दिशाभूल करु नये आणि तिथे नेऊन बसवू नये असे म्हणत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या नेत्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा :

Back to top button