

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी म्हणाले होते की, "हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे." यावर नवा वाद उद्भवला असून त्यामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हिंदी भाषेचा मुद्दा अधोरेखित करून गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिलं आहे. राऊत म्हणाले की, "एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचं आव्हान आता अमित शाह यांनी स्वीकारलं पाहिजे."