‘ज्यांची लायकीच नाही, त्यांना काय उत्तर द्यायचे’ ओवेसींची राज ठाकरेंवर जोरदार टीका | पुढारी

'ज्यांची लायकीच नाही, त्यांना काय उत्तर द्यायचे' ओवेसींची राज ठाकरेंवर जोरदार टीका

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरात आपण कोणाला उत्तर देण्यासाठी नव्हे तर मोफत शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यासाठी आलोय, असे म्हणत गुरुवारी (दि. १२) एमआयएमचे नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तेरी हैसियत नही, तुम्हे क्या जवाब दू, तुम तो खुद्द बेघर हो, जिन का एक भी खासदार, आमदार नही उन्हे क्या जवाब दू, अशा शब्दात हल्लाबोल केला. त्यासोबतच अकबरोद्दीन ओवेसी नफरत का जवाब मोहब्बत से देगा, असे म्हणत त्यांनी जोरदार चपराकही दिली.

हैदराबाद येथील ओवेसी स्कूल ऑफ एक्सलेन्सी या संस्थेच्या पहिल्या शाखेचे शहरात भूमिपूजन करण्यासाठी गुरुवारी अकबरोद्दीन ओवेसी शहरात आले होते. शहरात येताच त्यांनी विविध प्रमुख दर्गांवर माथा टेकून दर्शन घेतले. त्यासोबतच खुलताबादेतील औरंगजेबच्या दर्गावरही ते गेले. त्यावरून शहरातील राजकारण पेटले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करीत भोंगे निघालेच पाहिजे, असे म्हणत ४ मेची डेडलाईन दिली होती. दरम्यान ठाकरे यांच्या या वक्त्यांवर आज नाव न घेता ओवेसी यांनी जोरदार टीका केली.

काही लोक एका विशिष्ट समाजाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल, असे समजत आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम, शिख, ईसाइ, बुद्ध, पारसी, जैन या सर्व जातीधर्मांचे लोक राहातात. त्यामुळे यासर्वांच्या शैक्षणिक प्रगतीनेच देशाची प्रगती होणार आहे, असे असताना तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही व्देष करणाऱ्यांचे प्रेमाने उत्तर देणे पसंत करतो. हे लोक मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या चिथावणीला बळी बडू नका, असे म्हणत ओवेसी यांनी सभेला उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना आवाहन केले.

‘होय मी मुस्लिमांबद्दलच बोलतो’

मी फक्त मुस्लिम समाजाबद्दलच बोलतो, मला केवळ मुस्लिमांचाच कळवळा आहे, असे लोक बोलतात. त्यांना मी सागू इच्छितो की, होय मी मुस्लिमांबद्दलच बोलतो, बोलत आहे, आणि यापुढेही बोलत राहील. त्यांच्यासाठीच मी सर्व काही करेल. मला खुदाने जे जिवन दिले ते देखील सर्व त्यांच्या विकासासाठीच खर्च करेल. पंरतु त्यासोबतच आमच्या ट्रस्टमधून शिक्षण घेण्यासाठी जर इतर समाजाचे मुले आले, तर त्यांना देखील या ट्रस्टचे दरवाजे खुले आहेत.

हेही वाचलंत का ?

Back to top button