अनिल बाबर : “महाविकास आघाडी टिकवायची असेल, तर आमचं ऐकून घेतलं पाहिजे” | पुढारी

अनिल बाबर : "महाविकास आघाडी टिकवायची असेल, तर आमचं ऐकून घेतलं पाहिजे"

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : “महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घेतलं पाहिजे, म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही” असा इशारा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

येथे आयोजित शेतकरी मेळाव्यानंतर अनिल बाबर (Anil Babar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाबर यांनी आम्ही काही मंत्रीपद मागायला आलो नाही, नाही सत्ता मागायला आलोय, फक्त महाविकास आघाडीमध्ये आम्हाला त्रास होत आहे, असे सांगितले.

अनिल बाबर- तानाजी पाटील गुरू शिष्य प्रेमाचे अनोखे उदाहरण : एकनाथ शिंदे

जनतेच्या कामासाठी झटणारा अनिल बाबर यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे मतदारसंघाचे भाग्यच आहे. तसेच आमदारांना जनतेचे मन जिंकणारा तानाजी पाटील यांच्या सारखा सच्चा कार्यकर्ता मिळाला हे गुरू शिष्याचे प्रेमाचे अनोखे उदाहरण असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा वाढदिवसा निमित्त बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर आणि तानाजी पाटील यांच्या विषयी गौरवोद्गार व्यक्ते केले. यावेळी मंत्री शिंदे म्हणाले, आ.अनिल बाबर यांच्या आग्रहास्तव लोकांनी अध्यक्ष म्हणून बिरुदावली दिलेल्या तानाजी पाटील यांच्या वाढदिवसाला येण्याची संधी मिळाली.

हेही वाचलंत का ?

Back to top button