औरंगाबाद : मशिदीकडे तोंड करून भोंग्यावर गाणे लावले; थेट पोलीसावर गुन्हा दाखल !

औरंगाबाद : मशिदीकडे तोंड करून भोंग्यावर गाणे लावले; थेट पोलीसावर गुन्हा दाखल !
Published on
Updated on

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : मशिदीकडे तोंड करून भोंगे लावून गाणे लावल्याप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिसांनी ही कारवाई आज (सोमवार) केली. किशोर गंडाप्पा मलकूनाईक असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, राज्य सरकारने एकीकडे भोंगे हटवायचे की नाही, यावरून भूमिका स्पष्ट केली. तर इकडे औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नुकत्याच घडलेल्या या घटनेत प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news