

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाटीदार नेता व गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल ( Hardik Patel ) यांना भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने काय केले पाहिजे, हेही स्पष्ट केले.
हार्दिक पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वाचे कौतुक केले होते. भाजपचे नेते धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत, असे सूचक विधानही त्यांनी केले होते. यावरुन आज त्यांना भाजपमध्ये प्रवेश करणार का , असा सवाल पत्रकारांनी केला. यावेळी हार्दिक पटेल म्हणाले, "राहुल गांधी व प्रियांका वड्रा-गांधी यांच्यामुळे मी दु:खी नाही. तर गुजरात प्रदेश काँग्रेस नेतृत्त्वामुळे मी व्यथित आहे."
राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी प्रामणिक आणि मजबूत लोकांबरोबर काम करण्याची गरज आहे. त्यांना संधी देण्याची गरज आहे. हीच संधी आहे. गावा-गावांमध्ये जावा. तसेच शहरातही कठोर परिश्रम घ्या, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. मी दु:खी आहे का, असा सवाल केला जात आहे. एका कुटुंबात करबूरी होतच असतात. त्याचर चर्चाही होते. त्यामुळे मी यापूर्वीही म्हटलं होतं आहे की, अफवा पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक ज्यो बायडन यांनी जिंकली. त्यावेळी मी त्यांचे कौतुक केले होते. अमेरिकेतील उपराष्ट्रपती या भारतीय वंशाच्या आहेत;मग मी त्यांच्या पक्षात घुसखोरी करु का, असा सवाल करत लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष चांगले काम करत असेल तर त्यांचे कौतुक करावे. लोकशाहीत हेच तर स्वातंत्र्य आहे की, तुम्ही सर्वांना व्यवस्थेबाबत प्रश्न करु शकता, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :