गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीने सिने अभिनेते सयाजी शिंदे भावूक! | पुढारी

गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीने सिने अभिनेते सयाजी शिंदे भावूक!

गंगाखेड, पुढारी वृत्‍तसेवा : परळी राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा पार्श्वभूमीवर मोठी वृक्षतोड होत आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे या वृक्षतोडीने भावूक झाले असून त्‍यांनी सोमवारी परभणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्‍यांनी एसडीएम सुधीर पाटील यांना या महामार्गावरील वृक्षतोड तत्काळ थांबवावी असे साकडे घातले आहे.

‘सह्याद्री देवराई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी सयाजी शिंदे यांनी झोकून देत काम करत आहेत. ते गंगाखेड परिसरात मागील काही दिवसापूर्वी चित्रीकरणासाठी आले आहेत. परळी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये थांबले असताना त्‍यांना सोमवारी सकाळी ८:३० च्या सुमारास गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड निदर्शनास आली.
यावेळी याघटनेला भावूक होवून सयाजी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धावत घेतली. आणि त्‍याठिकाणी वृक्षतोड करत असलेल्या कंत्राटदार कर्मचारी, कामगारांना वृक्षतोड थांबविण्याची मागणी करत थेट परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्हा प्रशासनाने गंगाखेडचे एडीएम सुधीर पाटील यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले.

एसडीएम सुधीर पाटील यांनी घटनास्थळी येऊन राष्ट्रीय महामार्ग कामाच्या अनुषंगाने होत असलेली वृक्षतोड आणि त्‍याचबरोबर पर्यायी होत नसलेली वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाबाबतीत होणारी अक्षम्य प्रशासकीय उदासीनता असे अनेक प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. तसेच, वृक्षतोड होऊ नये या बाबतीत प्रशासनाल मागणी केली.

‘रिप्लांट’ करण्याबाबत आग्रह

गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील किमान वडांची महाकाय झाडे तोडल्यानंतर त्यांना आवर्जून सीमेलगतच ‘रिप्लांट’ करावे. जेणेकरून ऑक्सिजन वायू मिळण्यास मोठी मदत होईल. अशी अपेक्षा सयाजी शिंदे यांनी प्रशासनाकडे केली.

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला सूचना

सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीबाबत व्यक्त केलेली खंत व अपेक्षेबाबतीत राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क केला. त्‍यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्‍या आहेत, अशी माहिती सुधीर पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

हेही वाचा  

Back to top button