परभणी : कर्जाला कंटाळून बोरीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

परभणी : कर्जाला कंटाळून बोरीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बोरी (परभणी ) : पुढारी वृत्तसेवा  कर्जाला कंटाळून शेतकरी गोपाळ रामराव चौधरी (वय ३९) यांनी रविवारी ( दि २७ ) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे बोरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बोरी येथील शेतकरी गोपाळ चौधरी यांचे वडील रामराव चौधरी यांच्या नावे भारतीय स्टेट बँक शाखा बोरीचे ११ लाखांचे कर्ज आहे. तुळजाभवानी अर्बन बँकेचे ५१ हजारांचे स्वतःच्या नावे कर्ज आहे. गोपाल चौधरी हे त्यांचे वडील व भाऊ यांच्यासमवेत शेतीचे काम पाहतात. परंतु बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे, या मानसिक विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते.

रविवार दिनांक २७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोपाळ चौधरी यांनी शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button