राज्य बाजार समिती संघावर पंढरीनाथ थोरे विजयी | पुढारी

राज्य बाजार समिती संघावर पंढरीनाथ थोरे विजयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे संचालक मंडळावर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांची निवड झाली आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीला न्यायालयाने स्थगिती दिली होती.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे या संघाची पंचवार्षिक निवडणूक दि. २३ मार्च २०१८ मध्ये झाली होती. मात्र, आर्थिक दुर्बल घटक या कारणाने नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मतमोजणीला स्थगितीचा आदेश दिला होता. त्यावर दि. १५ मार्च २०२२ रोजी मुंबई खंडपीठाने हा आदेश स्थगिती उठवत मतमोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी (दि. २७ ) पुणे येथील साखर भवनात मतमोजणी झाली. महिला राखीव दोन जागांसाठी नाशिकच्या (स्व.) इंदुमती गुळवे विजयी झाल्या. विशेष मागास प्रवर्ग जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नाशिकचे पंढरीनाथ थोरे १६५ मते मिळवून ११४ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी जळगावचे अशोक पाटील यांना केवळ ५१ मते मिळाली.

हेही वाचा :

Back to top button