बीड : सावरगाव येथे ट्रॅव्हल्स-कारची समोरासमोर धडक; १२ प्रवासी जखमी | पुढारी

बीड : सावरगाव येथे ट्रॅव्हल्स-कारची समोरासमोर धडक; १२ प्रवासी जखमी

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : बीडहून मुंबईकडे जाणारी ट्रॅव्हल्स आणि अमहदनगरहून गेवराईकडे येणारी कार या दोन्ही गाड्यांची राष्ट्रीय महामार्ग-६१ वरील सावरगाव मोहटादेवी मंदिराजवळ समोरासमोर धडक झाली. दोन्ही गाड्यांमधील १२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री १२ वाजता झाला.

जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचा समोरील भाग चक्काचूर झाला. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. कार क्रमांक (MH 18 BR 5436) रविवार रोजी रात्री बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग- ६१ वर ट्रॅव्हल्सला धडक दिली.

हे वाचलंत का? 

Back to top button