बीड : खामगाव, सावरगाव येथील गोदापात्र कारवाईत ३ कोटींचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड : खामगाव, सावरगाव येथील गोदापात्र कारवाईत ३ कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथील गोदावरी नदी पात्रात अचानकपणे बुधवार रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह कारवाई केली. यामध्ये वाळू उपसा करणाऱ्या चार हायवा, एक ट्रक व 19 ब्रास वाळू असा ३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील खामगाव व सावरगाव गोदावरी नदी पात्रात दररोज अवैध वाळूचा हजारो ब्रास वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. बुधवार रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खामगाव व सावरगाव येथील गोदापात्रात त्यांनी आपल्या पथकासह कारवाई करत चार हायवा, एक ट्रकसह 19 ब्रास वाळू असा मिळून जवळपास ३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची वाहने येथील बसस्थानकातील आगारात लावण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, बालाजी दराडे, सचिन हंकारे, महादेव सातपुते सह गेवराई डी. बी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. या प्रकरणी उशिरा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button