Scrum 411 : रॅायल एनफिल्डनं आणली नवी बाइक, काय आहे त्यात खास | पुढारी

Scrum 411 : रॅायल एनफिल्डनं आणली नवी बाइक, काय आहे त्यात खास

पुढारी ऑनलाइन डेस्क : Royal Enfield कंपनीची नवीन मोटरसायकल Scrum 411 भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची किमत 2.03 लाख रूपयांपासून ते 2.08 लाख रूपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. स्क्रॅम 411 (Scrum 411) ही कंपनीची लोकप्रिय बाईक हिमालयन या मॅाडेलवर आधारित आहे. कंपनीचे हे नवे किफायतशीर मॅाडेल भारतीय बाजारपेठेत खूप चर्चेत आहे.

भारतीय बाजारपेठेतील Yezdi Scrambler आणि Honda CB350RS यासारख्या बाईक रॅायल एनफिल्ड (Royal Enfield) च्या स्क्रॅम 411 (Scram 411) सोबत प्रतिस्पर्धक म्हणून पहायला मिळतील.

स्क्रॅमचा 411 (Scram 411) आकर्षक लूक

स्क्रम 411 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ही नवीन बाइक सिल्व्हर, ब्लॅक, ब्लू, ग्रेफाइट रेड आणि यलो यासह अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रॉयल एनफील्डची ही बाइक सर्वसाधारण बाइक किंवा बुलेटपेक्षा वेगळी आणि शानदार वाटते. आकर्षक असे हेडलॅम्प, एलईडी टेललाइट, आरामदायी आसनांसह एर्गोनॉमिक डिझाइन यामध्ये आहे. नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लहान फ्रंट व्हील आणि बेसिक बॉडी पॅनल्सचा वापर स्क्रम 411 मध्ये केला गेला आहे.

बाइक आकाराने कशी असेल?

Royal Enfield Scram 411 ची चाकं फार मोठ्या आकाराची नाहीत. हिमालयाच्या तुलनेत व्हीलबेसचा आकार थोडासा लहान बनवलेला आहे, जो 1455 मिमी चा आहे आणि लांबी 2160 मिमी इतकी आहे. बाइकच्या पुढील बाजूचे चाक १९-इंच आणि मागील बाजूचे चाक १७-इंच इतके आहे. तसेच बाइकची उंची 1165 मिमी इतकी आहे.

कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की स्क्रॅम 411 चे इंजिन ही खास वैशिष्ट्यानुसार बनवले गेले आहे. यामध्ये 411cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन, पॉवर आणि टॉर्क आउटपूट, 24.3bhp आणि 32Nm इंजिन वैशिष्ट्यांसह आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

त्याचबरोबर याचा ग्राउंड क्लीयरन्समध्ये थोडासा केला आहे. जो 200 मिमी पर्यंत कमी केलेला पहायला मिळेल. याच्या सीटची उंची 795mm ठेवली गेली आहे, जी थोडी कमी उंचीची पहायला मिळेल. तसेच याला 190 mm फ्रंट ट्रॅव्हल आणि 180 mm रियर ट्रॅव्हलिंग सस्पेंशन मिळते.

या बाइकला पर्यायी ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीम देखील मिळते जी रॅायल एनफिल्डच्या Meteor 350 मध्ये पहायला मिळते. तसेच हिमालयनमध्येदेखील उपलब्ध आहे. बाइकची इंधन टाकी क्षमता ही 15 लिटर एवढी आहे. त्याचबरोबर गाडीचे एकूण वजन (इंधनाशिवाय) 185 किलो इतके आहे.

बर्‍याच दिवसांपासून या मोटरसायकलची वाट पाहत असलेल्या भारतीय ग्राहकांना आता ही नवी बाइक प्रत्यक्ष पहायला मिळेल. या बाइकची भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. 2.03 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू असून ती रु. 2.08 लाखांपर्यंत इतकी आहे.

हेही वाचा

Back to top button