INDvsSL 2nd Test : श्रीलंकेला सहावा धक्का, मैथ्यूज बाद | पुढारी

INDvsSL 2nd Test : श्रीलंकेला सहावा धक्का, मैथ्यूज बाद

बंगळूर : पुढारी ऑनलाईन

जसप्रित बुमराहने ३ तर मोहम्मद शमीने दोन विकेट्स पटकावल्या आहेत.

तर अक्षर पटेलने चरिथ असलंकाला माघारी धाडले आहे, आजच्या दिवस अखेर श्रीलंकेचा स्कोर ३० षटकांअखेर ८६ धावा इतका आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव ५९.१ षटकांत २५२ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरने (९२) सर्वाधिक धावा केल्या. ऋषभ पंतने ३९ आणि हनुमा विहारीने ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ९ षटकांत ३ गडी गमावून २० धावा केल्या.

शमीचे पहिले यश, श्रीलंकेची तिसरी विकेट

गोलंदाजीत बदल करताना रोहित शर्माने मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला आणि पहिल्याच चेंडूवर त्याने विकेटही घेतली. शमीने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारतनाला चार धावांवर बाद केले.

बुमराहला मिळाले दुसरे यश

जसप्रीत बुमराहने तिसर्‍याच षटकात दुसरी विकेट घेतली. यावेळी त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लाहिरू थिरिमानेला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. थिरिमाने सहा चेंडूत आठ धावा काढून बाद झाला.

श्रीलंकेला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला पहिला धक्का दिला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने कुसल मेंडिसला श्रेयस अय्यर करवी झेलबाद केले. मेंडिसने केवळ दोन धावा केल्या.

Image

श्रीलंकेचा पहिला डाव सुरू…

भारताच्या २५२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव सुरु झाला आहे. कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्ने यांनी सलामी दिली. तर भारताच्या जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवता केली.

श्रीलंकेला पहिला धक्का

जसप्रीत बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला पहिला धक्का दिला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने कुसल मेंडिसला श्रेयस अय्यर करवी झेलबाद केले. मेंडिसने केवळ दोन धावा केल्या.

श्रीलंकेचा पहिला डाव सुरू…

भारताच्या २५२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव सुरु झाला आहे. कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्ने यांनी सलामी दिली. तर भारताच्या जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवता केली.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव २५२ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९२ धावा केल्या. शेवटची विकेट म्हणून तो बाद झाला. ऋषभ पंतने ३९ आणि हनुमा विहारीने ३१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि माजी कर्णधार विराट कोहली (२३) पुन्हा एकदा अपयशी ठरले. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी ३ बळी घेतले. धनंजय डी सिल्वाला दोन यश मिळाले. शेवटची कसोटी खेळणाऱ्या सुरंगा लकमलने एक विकेट घेतली. एक फलंदाज (मयांक अग्रवाल) धावबाद झाला.

या डे-नाईट कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच खेळपट्टी फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरली. टीम इंडियाने पहिल्याच सत्रात ४ विकेट गमावल्या. दुसऱ्या सत्रात भारताने ६ विकेट गमावल्या.

श्रेयस अय्यरची फटकेबाजी

चहापानानंतर आलेल्या ऋषभ पंतने काही आकर्षक शॉट्स मारले आणि वेगवान फलंदाजी केली पण तो 39 धावांवर बाद झाला. त्याने 26 चेंडूंचा सामना केला. यानंतर जडेजा 4 धावा करून बाद झाला आणि अश्विनने 13 धावा केल्या मात्र श्रेयस अय्यरने फिरकी खेळपट्टीवर वेगवान फलंदाजी केली आणि लंकेच्या गोलंदाजांना लक्ष्य करत अर्धशतक पूर्ण केले. एका टोकाकडून झटपट विकेट पडत होत्या पण अय्यरने वेगवान फलंदाजी करत 90 चा टप्पा पार केला. तो शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला. अय्यरने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 92 धावा केल्या. अशा प्रकारे भारताचा संपूर्ण संघ 252 धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून एम्बुल्डेनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी 3 बळी घेतले.

पंतची आक्रमक खेळी..

ऋषभ पंत मैदानात उतरला त्यावेळी भारताची धावसंख्या ३ बाद ७६ होती. पंतने मैदानात येताच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने अवघ्या २६ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीत त्याने ७ चौकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट १५० होता. पंत झंझावाती अर्धशतकाकडे वाटचाल करत होता, पण लसिथला एम्बुल्डेनियाने त्याला बाद केले आणि भारताला चौथा धक्का दिला.

अक्षर पटेल बाद

सुरंगा लकमलने अक्षर पटेलला जास्त वेळ क्रीझवर राहू दिले नाही आणि ९ धावांच्या वैयक्तीक धावसंख्येवर बाद झाला.

भारताने २०० धावा पूर्ण केल्या..

शेवटची दोन षटके भारतासाठी उत्कृष्ट ठरली. भारतीय संघाने १२ चेंडूत ३ षटकारांसह २७ धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्याही २०० पार झाली आहे.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक 54 चेंडूत एका षटकारासह झळकावले.

भारताने १५० धावा पूर्ण केल्या…

सहा विकेट्स गमावून भारताने १५० धावांचा टप्पा गाठला.

रवींद्र जडेजा चार धावांवर बाद

भारताने आपली सहावी विकेट गमावली आहे. यावेळी मागील सामन्याचा हिरो असलेला रवींद्र जडेजा एम्बुल्डेनियाचा बळी ठरला. एम्बुल्डेनियाचा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर झपाट्याने आतल्या बाजूने वळला आणि जडेजाच्या ग्लोव्हजवर बाऊन्स झाला आणि स्लिप क्षेत्ररक्षक थिरिमानेच्या हातात गेला. जडेजाने १४ चेंडूत चार धावा केल्या.

ऋषभ पंत बाद..

भारताची पाचवी विकेट गेली. ऋषभ पंत वेगवान खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लसिथ एम्बुल्डेनियाने त्याची विकेट घेतली. पंतने बाद होण्यापूर्वी २६ चेंडूत ३९ धावा केल्या.

Image

भारताने 100 धावा पूर्ण केल्या

चहापानानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत धनंजयच्या षटकात सलग दोन चौकार ठोकले. यासह भारताने आपल्या १०० धावा पूर्ण केल्या.

विराट कोहलीकडून निराशा

विराट कोहली २३ धावा करून बाद झाला. यासह भारताने चौथी विकेट गमावली. श्रीलंकेचा ऑफस्पिनर धनंजय डी सिल्वाच्या शॉर्ट बॉलवर विराटने बॅकफूटवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू खूपच कमी राहिला. विराटच्या बॅटशी चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू स्टंपच्या अगदी समोर त्याच्या पॅडवर आदळला. विराट निराशेने खेळपट्टीकडे पाहत पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाहेर आहे हे त्याला माहीत होते. यामुळे त्याने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले नाही. विराटकडून या डावात शतक झळकावण्याची अपेक्षा होती, मात्र या डावातही त्याला तसे करता आले नाही.

Image

भारताची तिसरी विकेट पडली

भारतीय संघाने तिसरी विकेट हनुमा विहारीच्या रुपात गमावली. प्रवीण जयविक्रमाच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक डिकवेलाकरवी झेलबाद झाला. विहारीने ८१ चेंडूत ३१ धावा केल्या आणि ४ चौकार मारले. जयविक्रमाचा चेंडू ऑफ स्टंपच्या खेळपट्टीनंतर उसळला आणि बाहेर जाऊन विहारीच्या बॅटची बाहेरची कड घेऊन थेट यष्टीरक्षकाकडे गेला. डिकवेलाने दुसऱ्या प्रयत्नात झेल घेत हनुमाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Image

भारताच्या ५० धावा पूर्ण

सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने आपल्या ५० धावा पूर्ण केल्या आहेत.

रोहितही पॅव्हेलियनमध्ये परतला..

रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. अॅम्बुल्डेनियाने त्याला १५ धावांवर धनंजय डी सिल्वाकरवी झेलबाद केले. यावेळी भारताची धावसंख्या २९ होती.

Image

मयंक धावबाद

भारताला पहिला झटका दुसऱ्याच षटकात मयंक अग्रवालच्या रूपाने बसला. विश्वा फर्नांडोच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मयंक अग्रवाल फटका मारत होता, पण हा चेंडू पॅडवर आडळला. त्यावर श्रीलंकेने जोरदार अपील केले. याचवेळी मयंक धाव घेण्यासाठी धावला. रोहितने नकार दिल्यानंतर तो दुर्दैवाने धावबाद झाला. फर्नांडोच्या नो बॉलमुळे भारताला एक धाव मिळाली पण मयंकलाही धावबाद व्हावे लागले. मयंक सात चेंडूत चार धावा काढून बाद झाला.

टीम इंडिया :

मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

Image

टीम श्रीलंका :

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्वा फर्नांडो, प्रवीण जयविकरामा

Back to top button