आधी बॉसने झटक्यात ९०० जणांना काढून टाकले, आता तीच कंपनी ३ हजार जणांना कमी करणार !

3000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत ही कंपनी
3000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत ही कंपनी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्राहकांना ऑनलाइन कर्ज देणाऱ्या Better.com कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी बुधवारी अमेरिका आणि भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी अवघ्या काही मिनिटांच्या झूम कॉलवर त्यांनी कंपनीच्या ९०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता याच कंपनीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी अजून एक मोठी यादी तयारी केली आहे. (Unemployment)

दरम्यान 50% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येण्याचा अंदाज

यासंबंधीत प्रकरणातील एका अहवालात मिळालेल्या माहितीनूसार better.com कंपनीचे भारतीय वंशाचे अमेरिकन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग आठवड्याभरात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करीत आहेत.

कंपनीचे सीएफओ केविन रायन यांनी कंपनीला एक ईमेल पाठवला आणि म्हटले की, "व्याज दराचे वातावरण आणि बाजारातील अस्थिरतेचा विचार करता काही बदल करावे लागतील." "दुर्दैवाने, याचा अर्थ असा आहे की आपण आपले कामकाज अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी काही कठोर पावले उचलली पाहिजेत, म्हणून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कंपनीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी केला पाहिजे."

विशेष म्हणजे better.com कंपनीमध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांतील कर्मचारी येथे कार्यरत आहेत. या न्यूयॉर्कस्थित कंपनीने आपल्या ९ टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच ९०० जणांना झूम कॉलवर काढून टाकल्यानंतर लगेचच तीन महिन्यांनी हे महत्ताचे पाऊल उचलण्यात आले आहे, असे टेकक्रंचच्या (Techcrunch) अहवालात म्हटले आहे.

या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, या निर्णयासोबतच एक मोठी टाळेबंदी बुधवारी, ९ मार्च रोजी होणार आहे. कंपनीकडे गरजेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याने आणि बाजारात टिकून राहण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याने या सर्वांना कामावरून काढून टाकले जात आहे असे यावेळी सांगण्यात आले.

याआधी अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी सोडावी लागली आहे.

2018 मध्ये अमेरिकेत 21.9 दशलक्ष लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते, म्हणजेच दररोज 60,000 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. पण आता गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत 45 दशलक्षाहून अधिक लोकांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्यांच्या कंपनीचे बॉस आणि अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या शोषणाला वैतागून राजीनामा दिला.

भारतातही, लॉकडाऊन दरम्यान,  2 कोटी 10 लाख नोकऱ्या गेल्या. त्यानुसार दररोज 1 लाख 46 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. कधीकधी परिस्थिती अशी बनते की कंपन्यांना कामावरून कमी करावे लागते, परंतु हे करण्याचे काही मार्ग आहेत. कुणालाही रातोरात नोकरीवरून काढून टाकता येत नाही.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news