बीड: जन्मठेपेच्या शिक्षेतील पॅरोलवर सुटलेल्‍या कैद्‍याची गळफास लावून आत्महत्या | पुढारी

बीड: जन्मठेपेच्या शिक्षेतील पॅरोलवर सुटलेल्‍या कैद्‍याची गळफास लावून आत्महत्या

बीड पुढारी वृत्तसेवा: जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर सुटलेल्या बीड शहरातील माऊली नगर येथील एकाने घरी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोटाच्या आजाराने व मानसिक त्रासाने गळफास घेवून आत्महत्या केली. सुनील दामोदर गायकवाड( वय ४९, रा. माऊली नगर )  त्‍याचे नाव आहे. सुनील गायकवाड याने  पत्नीसह दोन मुलांचा खून केला हाेता. या गुन्‍ह्यात त्‍याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

सुनील गायकवाड हा कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पॅरोलवर घरी आला होता. पोटाच्या आजाराने व मानसिक त्रासातून रविवारी मध्यरात्री राहत्या घराच्‍या दुस-या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेवून त्‍याने आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

Back to top button