लातूर : प्राचार्यांनी घेतली सात हजाराची लाच | पुढारी

लातूर : प्राचार्यांनी घेतली सात हजाराची लाच

लातूर, पुढारी वृत्तसेवा :
अभ्यासिका केंद्रासाठी खर्च तथा दुरुस्ती अग्रिम म्हणून अदा करण्यात आले होते. यामध्ये १५ हजाराचा चेक देण्यात आला होता. यातील सात हजार रुपये लाच म्हणून स्वीकारणाऱ्या मुरुड येथील डाएटच्या प्राचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी रंगेहात पकडले. बळीराम गणपतराव चौरे, असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्राचार्य बळीराम चौरे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांत मुरुड येथे असलेल्‍या अभ्यासिकेच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कामाचा पंधरा हजार रुपयाचा चेक काढण्यासाठी साडेसात हजार रुपयांची लाच मोबदला म्हणून तक्रारदारास मागितली होती. त्‍यांनी सात हजारावर तडजोड झाली होती. याबाबत संबंधिताने एसीबीला कळवले होते त्यानुसार लातूर एसीबीचे पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने सापळा एका हॉटेलात लावला होता. दरम्‍यान , चौरे लाच स्वीकारताना पकडले गेले. त्‍यानंतर त्‍याना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button