नागपूर : बिबट्याच्या कातडीसह तीन आरोपी ताब्यात | पुढारी

नागपूर : बिबट्याच्या कातडीसह तीन आरोपी ताब्यात

नागपुर, पुढारी वृत्तसेवा :
बिबट्याच्या कातडीसह तीन आरोपींना वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वनविभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले. डब्ल्यूसीसीबीने दिलेल्या माहितीनुसार मिहान येथे ही स्तकरी होणार होती. त्यावरून वनविभागाची टिम गेल्या आठ दिवसांपासून मिहान परिसरात लक्ष ठेवून होती. रविवारी या टिमने कापसी खुर्द येथून तिघांना बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतले.

अशी केली कारवाई

तीनही आरोपींशी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या कातडीची बोलणी करण्यात आली. या दरम्यान आरोपींनी तीन ठिकाणे बदलली. ६ मार्च रोजी कापसी खुर्द येथील जय उमीया रोड लाईन्समध्ये सापळा रचण्यात आला. यात संजीव डमरूधर बेहेरा (वय ४२), नरेश तेजराम दरोडे (वय ४८), व प्रवीण श्रीराम लांजेवार (वय ४१) यांना ताब्यात घेण्यात आले. बिबट्याच्या कातडीची लांबी ४ फूट असून रूंदी दीड फूट आहे. ही कातडी ताब्‍यात घेत त्‍यांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा  

Back to top button