राज्‍यातील कोरोना निर्बंध कमी होणार : राजेश टोपे यांचे संकेत | पुढारी

राज्‍यातील कोरोना निर्बंध कमी होणार : राजेश टोपे यांचे संकेत

जालना, पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येमध्‍ये घट होत आहे. मार्चच्या मध्यावधीपर्यंत काेराेनाची तिसरी लाट बर्‍यापैकी ओसरेल, अशी शक्‍यता आहे. कोरोनाचे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकारात्मक आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  राज्यात मास्क मुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. जशी परिस्थिती येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. नागरिकांनी पहिल्या आणि दुसर्‍या डोस घ्‍यावा. राज्यात तिसर्‍या लाटेची सुरूवात झाली तेव्हा सुरुवातीस ४८ हजारांपर्यंत रुग्णसंख्या गेली होती. ती 25 हजार व आता तर 6 हजारांवर आली आहे. रुग्णसंख्या कमी हाेत असल्यामुळे साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट बर्‍यापैकी ओसरताना दिसून येणार आहे. त्यामुळे निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याविषयी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याने याबाबत निर्णय घेतील, असेही टोपे यांनी सांगितले.

हेही वाचलं का ? 

Back to top button