पंतप्रधानांची सुरक्षा करत येत नाही, ते मुख्यमंत्री पंजाबची सुरक्षा करतील का? अमित शहा | पुढारी

पंतप्रधानांची सुरक्षा करत येत नाही, ते मुख्यमंत्री पंजाबची सुरक्षा करतील का? अमित शहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “जे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षित मार्ग देण्यात यशस्वी ठरले नाही, ते राज्याची सुरक्षा काय करणार”, असा खोचक सवाल अमित शहा यांनी पंजाबचे मुख्‍यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना आज केला. निवडणूक प्रचार सभेत ते बाेलत हाेते.

यावेळी अमित शहा म्‍हणाले की, “चरणजीत सिंह चन्नी हे पुन्हा पंजाबमध्ये काॅंग्रेसचं सरकार बनविण्याचे स्वप्न पाहात आहेत. एक मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग सुरक्षित करून देऊ शकत नाही.  ते पंजाब राज्याला सुरक्षा प्रदान करू शकेल का?”.

“पंजाबमध्ये एनडीएची सत्ता आली, तर अमली पदार्थांचा दुरुपयोग करण्याऱ्यांवर चार जिल्ह्यांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या शाखा कार्यालय स्थापन करणार आहे. अमली पदार्थविरोधी संदर्भात संघटना स्थापित केल्या जातील”, असं आश्वासन त्‍यांनी दिले.

पंजाबमध्ये विधानसभेसाठी १४  फेब्रुवारीला मतदान हाेणार हाेतेे; पण, नंतर ही तारीख २० फेब्रुवारी करण्‍यात आली. पंजाब राज्यातील ११७ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.

हे वाचलंत का?

Back to top button