Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल जाहीर! लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; एका क्लिकवर पाहा तुमचा निकाल

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. राज्यातील १८ लाखांहून अधिक विद्यार्थी आता अधिकृत वेबसाइट आणि DigiLocker वरून आपला निकाल पाहू शकतात.
Maharashtra HSC Result 2026
Maharashtra HSC Result 2026Pudhari
Published on
Updated on

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. राज्यभरातील तब्बल १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतात. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्सुकता आणि पुढील शिक्षणाच्या नियोजनाची धावपळ सुरू झाली आहे.

पुणे येथील बोर्ड कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा करण्यात आली. यावेळी एकूण निकालाची टक्केवारी, विविध शाखांचा निकाल, जिल्हानिहाय कामगिरी आणि इतर महत्त्वाची आकडेवारी जाहीर करण्यात आली.

विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. यासाठी mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या वेबसाइट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना DigiLocker वरूनही डिजिटल मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे.

महाराष्ट्र HSC निकाल २०२६ तपासण्यासाठीची अधिकृत संकेतस्थळे

विद्यार्थी खालील प्लॅटफॉर्म्सवर आपला निकाल तपासू शकतात:

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Maharashtra HSC Result 2026” या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सीट नंबर आणि हॉल तिकीटावर नमूद केलेले आईचे पहिले नाव टाकून निकाल पाहता येईल. निकालाची तात्पुरती मार्कशीट डाउनलोड करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

DigiLocker वरून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे लागेल. त्यानंतर Education विभागात जाऊन “Maharashtra HSC Result 2026” निवडल्यावर मार्कशीट डाउनलोड करता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत निकाल जाहीर

  • पुणे - ९१.२५

  • नागपूर - ८८.६७

  • छत्रपती संभाजीनगर - ८८६८

  • कोल्हापूर - ८९.९७

  • अमरावती - ९०.९२

  • नाशिक - ९०..७२

  • लातूर - ८४.१४

  • कोकण - ९४.१४

  • मुंबई - ९०.०८

राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार

सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा

Maharashtra HSC Result 2026
Raja Shivaji Movie : शिवाजी महाराजांच्या भावविश्वाचा वेध - राजा शिवाजी

यंदा बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडल्या होत्या. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते.

बोर्डाने यंदाही ग्रेडिंग पद्धत कायम ठेवली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन, ६० ते ७४ टक्के गुण मिळवणाऱ्यांना फर्स्ट क्लास आणि ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेची झेरॉक्स (Xerox Copy) कॉपी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना आधी उत्तरपत्रिकेची प्रत मिळवणे आवश्यक असेल.

Maharashtra HSC Result 2026
LPG Price Hike: स्वयंपाकाच्या गॅसचे भाव आवाक्याबाहेर! घरगुती सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महाग होणार; जाणून घ्या दर

निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश, करिअर निवड आणि पुढील शैक्षणिक वाटचालीचे नवे दरवाजे खुले झाले आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांना तात्पुरती मार्कशीट डाउनलोड करून ठेवण्याचा आणि नंतर संबंधित महाविद्यालयातून अधिकृत गुणपत्रिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news