LPG Price Hike: स्वयंपाकाच्या गॅसचे भाव आवाक्याबाहेर! घरगुती सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महाग होणार; जाणून घ्या दर

LPG Price Hike: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लवकरच ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
LPG Price Hike
LPG Price HikePudhari
Published on
Updated on

LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लवकरच ४० ते ५० रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.

१ मे रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास १ हजार रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील ५ ते ७ दिवसांत याबाबत निर्णय जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

LPG Price Hike
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९१३ रुपये आहे. मुंबई आणि पुण्यात १४.२ किलो सिलेंडर सुमारे ९१२.५० रुपयांना मिळत आहे. मात्र दरवाढ लागू झाल्यास हे दर आणखी वाढणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील एलपीजीच्या किमतींवर होत असल्याचे सांगितले जात आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यामधील वाढती तफावत भरून काढण्यासाठी दरवाढ आवश्यक आहे.

LPG Price Hike
OPEC Impact: तेल संकटाची भीती! UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? भारतावर काय होणार परिणाम?

घरगुती गॅस महागल्यास त्याचा परिणाम केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, टिफिन सेवा, केटरिंग व्यवसाय आणि विविध खाद्यसेवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

या संभाव्य दरवाढीवरून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर विरोधकांनी आधीच सरकारवर टीका सुरू केली आहे. आता घरगुती सिलेंडरचे दर वाढल्यास महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला आणखी घेरले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र बाजारातील हालचाली आणि सरकारी स्तरावरील चर्चांमुळे लवकरच दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news