

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : ८ जुलै २०२१ ला कोल्हापूर सत्र न्यायलयाने सुनील कोचिकोरवी या युवकाला आईच्या खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. सुनील याने २८ ऑगस्ट २०१७ ला त्याच्या आईचा खून केला होता. तसेच आईच्या मृतदेहाचा तुकडे केले होते. या आरोपीने खुनानंतर आईचे काळीज तळून त्याला चटणी मीठ लावून खाल्ले होते. किचनमधील तव्यावर मिळालेल्या अर्धवट काळजाने हा प्रकार उघडकीस आला. यात पोलिसांनी DNA तंत्रज्ञान वापरल आहे.
तपासअधिकारी संजय मोरी यांनी पुढारी ऑनलाईनला या गुन्ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चूक राहू नये यासाठी DNA तंत्राचाही वापर केला होता अशी माहिती त्यांनी दिली.
मोरे म्हणाले, "घटना कळताच आम्ही माकडवाला वसाहतीत गेलो. जमावाने आरोपीला पकडले होते. ज्या घरात खून झाला तिथली दृश्य फारच भयानक होती. मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे करून ते बाजूला ठेवले होते. किचनमधील दृश्य तर आणखीन भयानक होतं. तिथं तव्यावर काळीज तळलेलं दिसून आलं. या काळजाचा काही भाग गायब होता. त्यातून आम्हाला शंका आली की या आरोपीने ते खाल्लं असावं."
भक्कम असे पुरावे गोळा करणे हे पोलिसांसमोरील आव्हान होतं. शिवाय आरोपी हा विकृत आहे, हा गुन्हा माणुसकीला काळिमा फासणारा दुर्मिळातील दुर्मिळ आहे हे न्यायालयात सिद्ध होणं आवश्यक होतं. त्यामुळे पोलिसांनी DNA तंत्राचा वापर पोलिसांनी केला.
आरोपीच्या अंगावर लागलेले रक्त बॉडीवॉशने गोळ्या करण्यात आले. तसेच नखातील रक्त ही गोळा करण्यात आले. आरोपीने खून केल्यानंतर आईचं काळीज खाल्लं होतं हे सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यासाटी Stomach Wash डॉक्टरांच्या मदतीने घेण्यात आला. (Stomach Wash म्हणजे उलटी करायला लावून पोटातील घटक गोळा करणे). या सर्व नमुने पुण्यात DNA चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, या चाचणीतील DNA हा मृतदेहाच्या DNAशी मॅच करण्यात आला.
पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुचकता दाखवल्याने या नराधमाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवणे शक्य झाले.