बेळगावातील तरुणाचा खून; कोल्‍हापुरातील दोन तरूणांना अटक

File Photo
File Photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा बेळगाव मध्ये भर चौकात रस्‍त्‍यावर एका व्यक्‍तीचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी कोल्‍हापुरातील दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली. प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (राहणार राजारामपुरी 14 वी गल्ली कोल्हापूर) आणि आकाश काडाप्पा पवार (राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मुख्य संशयित अक्षय साळुंखे यांच्या सांगण्यावरून हल्लेखोराने नागराज गाडीवडर (वय 32) राहणार बेळगाव, गँगवाडी याचा खून केला.  बेळगाव येथील माळमारुती पोलीस ठाणे हद्दीत (बुधवारी) दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्‍या परिसरात रस्त्यावर धारदार फरशीने हल्ला करून खून केला होता.

या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना कोल्हापूर येथील हल्लेखोरांनी बेळगाव येथील तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने रात्री उशिरा कोल्हापुरात प्रथमेश कसबेकर आणि आकाश पवार यांना बेड्या ठोकल्या. हल्लेखोरांना बेळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news