Malkapur Renaming Protest: मलकापूरचे 'मंगलपूर' करण्याला ग्रामस्थांचा विरोध; मोर्चा पाहून धाबे दणाणले.. घेतला मोठा निर्णय

Malkapur Renaming Protest
Malkapur Renaming Protestpudhari
Published on
Updated on

Malkapur Renaming Protest: कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरचे नाव बदलून मंगलपूर करण्याला ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाविरूद्ध एल्गार पुकारला असून मलकापूरमधील ग्रामस्थांनी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला आहे. शिवतीर्थपासून नगरपालिके पर्यंत निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Malkapur Renaming Protest
Sonam Wangchuk hunger strike : "पुन्हा उपोषण करण्यास भाग पाडले गेले, कदाचित जीवही जाईल; आता माघार घेणार नाही"; सोनम वांगचुक

ग्रामस्थांनी आंदोलन करत मलाकपूरचे नाव मंगलपूर करण्याबाबतचा केलेला ठराव रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ठराव रद्द करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं.

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरचे नाव मंगलपूर करण्याबाबतचा ठराव काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. नरगाध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. मात्र याला नागरिकांचा मोठा विरोध होता. त्यानंतर हा ठराव स्थगित करण्यात आला होता.

Malkapur Renaming Protest
Shiv Sena UBT Protest : ओमराजेंविरोधात नळदुर्गमध्ये शिवसैनिक उतरले रस्‍त्‍यावर

मात्र ठराव स्थगित नाही तर रद्द करावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी मलकापुरात भव्य मोर्चा काढल्यानंतर आता हा ठराव रद्दा करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थिती असा ठराव करू नसेय मलाकापूरचे नाव मलकापूरच असावं अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीचे निवेदन देखील नगरपालिकेला देण्यात आले होते.

Malkapur Renaming Protest
Shaktipeeth Expressway Protest | 'शक्तिपीठ’ विरोधात शेतकऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्ग रोखला: वाहतूक ठप्प

नागरिकांचा तीव्र विरोध पाहून अखेर नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांना नमती भूमिका घ्यावी लागली. त्यांनी मलकापूरचे मंगलपूर करण्याचा ठराव रद्द करणार असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. नागरिकांनी जर या संदर्भात पुढे कधीही असा विचार करू नये अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जड दम देखील नागरिकांनी भरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news