कोल्हापूर : दहावीचा विज्ञान, तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटलेला नाही; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

paper leak
paper leak
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर बुधवारी (दि.३०) होत आहे. दरम्यान हा पेपर जयसिंगपूरमध्ये फुटल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.  ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्त्यांनी  पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत गोंधळ घातला.

दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटला नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल विज्ञान व तंत्रज्ञान भाग-2 विषयाचा सांकेतांक क्रमांक N-397 आहे. परंतु प्रत्यक्षात मूळ प्रश्नपत्रिकेची तपासणी केल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञान विषय मराठी माध्यमांचा सांकेतिक क्रमांक N-744 व इंग्रजी माध्यमांचा N-745 असल्याचे दिसून आले आहे.

व्हायरल प्रश्नपत्रिकेतील कंटेंट पूर्णपणे वेगळा आहे. कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियावर पेपर व्हायरल केला आहे. पेपर फुटलेला नाही. या प्रकरणाची तपासणी व शहानिशा करण्याचे निर्देश कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांना दिले आहेत. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news