कोल्हापूर : राजारामबापू, निनाईदेवी, माणगंगा कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू | पुढारी

कोल्हापूर : राजारामबापू, निनाईदेवी, माणगंगा कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’ आटपाडी, ‘राजारामबापू’ साखराळे आणि निनाईदेवी साखर कारखाना कोकरूड या कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोरोनासह अन्य कारणांनी निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती. निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांबरोबर साखर कारखान्यांच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया जाहीर केली आहे. आता मतदारयादी तयार करण्यास सुरुवात होणार आहे. 30 मार्च 2020 पूर्वी सभासद झालेली व्यक्‍ती मतदानास पात्र ठरणार आहे. पंधरा दिवसांत कच्ची मतदारयादी तयार होणार आहे. कोल्?हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे व आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना, गडहिंग्लज यांचाही समावेश आहे. कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती; पण मतदारयादीवरून सभासदांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात भोगावती, आजरा, उदयसिंगराव गायकवाड या कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात बिद्री साखर कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Back to top button